Valse Patil On Morcha : शांतता राखा, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल नुपूर शर्मा ( Nupur Sharma ) यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणावर मुस्लिम जनसमुदाय आज विविध ठिकाणी रस्त्यावर ( Muslim Protest ) उतरला आहे. यासंदर्भात शातता राखण्याचे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Valse Patil ) यांनी केले आहे. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या आहेत. नूपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाची व त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची गंभीर दखल राज्य शासन व गृह विभागाने घेतली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. सर्वांनी शांतता पाळावी, राज्यात कुठेही कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
No comments