web-ads-yml-728x90

Breaking News

KCR New National Party BRS : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर करणार नव्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा!


 

BY - युवा महाराष्ट्र लाइवहैदराबाद

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे नवा राष्ट्रीय राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. ते भारतीय राष्ट्रीय समिती ( Bharat Rashtriya Samithi (BRS) ) या नावाने ते नवा पक्ष काढणार आहेत. तर पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की ते पक्षासाठी कार चिन्ह देखील मागू शकतात. ते लवकरच याचे नाव नोंदणी करणार असल्याचे बोलले जात आहे. हैदराबादेतील प्रगती भवनात शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी नवीन राष्ट्रीय पर्याय, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका, विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आणि ताज्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत केसीआर यांनी बीआरएसबाबत खुलासा केल्याचे दिसते. या महिन्याच्या 19 तारखेला टीआरएस राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले आहे. विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार, पाच तास चाललेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. "भाजपचे अत्याचार वाढले आहेत. विरोधी पक्षातही काँग्रेस अपयशी ठरल्याने देशातील जनता पर्यायी राजकीय ताकदीची वाट पाहत आहे. नवा पक्ष ही भूमिका बजावेल. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा पर्यायी निर्मितीसाठी व्यासपीठ राष्ट्रीय शक्ती म्हणून वापर करावा. विविध पक्षांना एकत्र आणण्याची आणि एनडीएच्या उमेदवाराला पराभूत करून भाजपला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे. या रणनीतीच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून टीआरएस राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रिय होईल. तेलंगणातील राजवट आणि योजनांना यश मिळत आहे. याला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. राज्यांमधील विकास आणि कल्याणकारी कार्यक्रमांना अडथळा आणण्यासाठी कर्जावर निर्बंध लादले जात आहेत. त्याचा सामना करू या. समविचारी पक्षांना भेटून रणनीती तयार करू या. निर्बंध उठवण्यासाठी केंद्रावर दबाव आणूया. त्यासाठी तयार राहा. यासाठी कायदेशीर लढाई लढू.''असे केसीआर बैठकीत म्हणाले.

No comments