Thane Crime : धक्कादायक! वृद्ध आई वडिलांची गळा चिरून हत्या; आरोपी मुलगा गजाआड
BY - युवा महाराष्ट्र लाइव – टिटवाळा
कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून पोटच्या मुलानेच वृद्ध आई वडिलांची राहत्या घरातच गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कल्याण जवळ असलेल्या टिटवाळा मांडा परिसरातील एका इमारतीत घडली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात आरोपी मुलावर दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अनमोल भोसले (३७) असे आई वडिलांच्या दुहेरी हत्येप्रकरणी अटक आरोपी मुलाचे नाव आहे. तर अशोक भोसले (७०) व विजया भोसले (६०) असे हत्या झालेल्या आई वडिलांचे नाव आहे. कल्याण जवळ टिटवाळा-मांडा येथील पंचवटी चौकातील साई दर्पण इमारतीत मृतक अशोक व त्यांची पत्नी विजया आरोपी मुलगा अनमोल असे कुटुंब राहत आरोपी अनमोलचा विवाह झाला असून तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. अनमोलने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्याच्या बहिणीला आई-वडील मृत झाल्याचे सांगत गुरुवारी (९जून ) रोजी घरी बोलावून घेतले. त्यानंतर अनमोलची बहीण घरी आली असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आई-वडिलांचा मृतदेह पाहून तिला धक्काच बसला. शिवाय घरात दुर्गंधीही येत होती तर आरोपी अनमोल दोन्ही मृतदेहांच्या शेजारीच बसला होता. सगळच संशयास्पद वाटल्याने बहिणीने या घटनेची माहिती कल्याण पोलिस ठाण्यात दिली.
No comments