Rajyasabha Election 2022 : राज्यसभेसाठी आज होणार मतदान; सहाव्या जागेसाठी अटीतटीची लढाई
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
विधानसभेतून राज्यसभेवर ( Rajyasabha Election 2022 ) जाणाऱ्या सहा जागांसाठी आज ( 10 जून ) मतदान होत आहे. एकूण सात उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावत असून, त्यापैकी सहाव्या जागेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. ही जागा आपल्याकडे खेचण्यासाठी महाविकास आघाडी विरोधात भाजपाने जोर लावला आहे. मात्र, अपक्ष, इतर छोटे पक्षांच्या आमदारांची मते निर्णायक ठरणार असल्याने ते कोणाला मतदान करणार हे या निवडणूक प्रक्रियेनंतर समोर येणार आहे. राज्यसभेची निवडणूक आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक, तर भाजपाने तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एकूण सहा जागांसाठी निवडणूक होणार असली तरी एकूण सात उमेदवार लढवणार अहेत. एकूण पाच जागा सहज निवडून येतील. मात्र, सहाव्या जागेसाठी लढत होणार आहे. इतर छोटे पक्ष, अपक्ष आमदारांच्या मतांवर सहाव्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.
No comments