Murbad Police Station | मुरबाड पोलिसांची धडक कारवाई : छापा मारून नष्ट केले गावठी दारू बनविण्याचे कच्चे रसायन
BY - YML NEWS - मुरबाड,ठाणे
मुरबाड पोलीस ठाणे कडून मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनात दि २५ में २०२२ पासून बेकायदेशिर गावटीदारू हातभट्टी विरुद्ध कायदेशीर कारवाई अभियान राबवण्यात येत आहे.
ह्या कारवाई अंतर्गत मुरबाड पोलिसांनी नारीवली, उचले, खाटेघर, वाघाची वाडी, कोरावळे, चिरड,तलेखल ,खोपिवली परिसरातील सर्व दारू भट्ट्यावर कायदेशीर कारवाई करून समूळ नष्ट केल्या आहेत आणि आरोपींना अटक करून कारवाई केली आहे त्यामुळे बेकायदेशीर दारू भट्टी धारकांचे धाबे दणाणले आहेत
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे, api सोनोने, psi निंबाळकर,psi तळेकर, psi कदम, Asi/दाभाडे, Asi/गुंड,पोहवा/ निचीते, पोहवा/शेलार,पोहवा/चतुरे, पोहवा/ भोसले,पोहवा/डोईफोडे,पोहवा/ अडबोल,पोहवा/विचारे,पोहवा/खैरे, पोना/ के. पाटील, पोना/जीवन पाटील,पोना/रामा शिंदे, पोना/मोरे,पोशि/शिरसाठ, पोशि/बांगर , मपोशी/जया फाळे यांनी प्रत्येक्ष सहभाग घेवून कारवाई केली आहे
मुरबाड पोलिसांच्या ह्या कारवाई चे संपूर्ण मुरबाड तालुक्यात स्वागत होत आहे . महिला वर्ग स्वतः होऊन पुढे येउन ही माहिती पोलिसांना देत आहेत.कारण ह्या गावटीदारू मुळे त्यांचे पती दारू पियुन त्यांचा संसार उद्वस्त करत होते पोलिसांच्या ह्या कारवाई मुळे पती पगार घेऊन घरी येते आहेत.मुलाबाळांचे हित होत आहे असे महिलांचे म्हणणे आहे त्यांनी पोलीस कारवाईचे समर्थन करून पोलीस आमचा संसार वाचवत आहेत पोलीसांचे ईश्वर भले करेल असे आशीर्वाद देत आहेत.
गावचे सरपंच,पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष, व गावकरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पांढरे यांचे संपर्कात असुन माहिती मिळताच कारवाई केली जात असल्याने हे बेकायदेशीर दारू भट्टी नष्ट करण्यात यश येत आहे.
पोलीस कारवाई सोबत जागृती देखिल करत आहेत. ज्या व्यक्ती दारू पिणे सोडत आहेत त्यांचा सत्कार पोलीस करत आहेत, दारू विक्री बंद करणाऱ्या व्यक्तीला पण सन्मानित करण्यात येणार आहे त्यामुळे पोलीसांच्या ह्या कारवाईला मोठे यश प्राप्त झाले आहे.
आता पर्यंत २३ बेकायदेशीर दारूच्या हातभट्टी समूळ नष्ट करून, अजामीन पात्र गुन्हे दाखल करून आरोपी अटक केले आहेत त्यामुळे मुरबाड पो. स्टे.च्या ह्या कामगिरीचे जनते मधे कौतुक होत आहे व मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे.
No comments