शिवसेनेची शिंदे बंडखोरीचा फायदा आणिं फटका भाजपालाच....!
BY – नामदेव शेलार,YML NEWS – मुंबई
मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि शिवसेनेचा बालेकिल्ला महाराष्ट्राची शान अशी मराठी माणसाची ओळख असलेल्या शिवसेनेत सत्तासिहासनात बंडखोरी झाली.गेल्या अनेकवर्षे हिदुत्वावर शिक्कामोर्तब असणारी सेना भाजपा युती दुसर्या शतकात 2019 ला तुटली कारण फक्त सेनेला मुख्यमंत्री…!
गेले तीन वर्षे शिवसेनेने कट्टर राजकीय विरोधक काँगे्रस राष्ट्रवादी सोबत सत्ता भोगली त्या कालावधीत भाजपाला सेनेचा हवी होती कारण कोणत्याही निवडणुकीत सेनेची मते हिंदुत्वाच्या नावाने भाजपाला मिळत होती परंन्तु कॉगे्रस राष्ट्रवादीची मते भाजपाला मिळू शकत नव्हती त्यातच पुन्हा महानगर पालिका जिल्हापरिषद लोकसभा विधानसभा टप्पाटप्याने येतील त्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँगे्रस अन्य घटक पक्ष एकत्र आल्यास भाजपाचा प्रचंड नुकसान होईल भाजपामधील काही नेते कार्यकर्ते लोकप्रतिनिधी सेना राष्ट्रवादी मध्ये जातील त्यापेक्षा शिवसेनेचा पुन्हा घरोबा करण्याचा भाजपाचा प्रयत्न फायदयाचा वाटत असताना धोक्याचाही तितकाच आहे.
ज्या ठाणे जिल्हयात एकनाथ शिंदेचे प्राबलय आहे.तेथे मुरबाड विधानसभा सोडता इतरत्र भाजपा वाढेल अशी शकेता नाही पण शिवसेनेने राष्ट्रवादीशी युती केल्यास भाजपाला फटका बसेल आज भाजपा सत्तेत येवुन पाया भक्कम करण्याचा प्रयत्न करेल मात्र जुन्या नेतृत्वात असलेले अंतर्गत मतभेद याचा फायदा राष्ट्रवादीच घेईल.
शिवसेनेने इतर पक्षातुन प्रवेश दिलेल्याना एकनाथ शिंदे यांचा प्रमुख पाठिंबा होता भाजपा त्यांचा विरोधक पक्ष असताना त्यामध्ये शिंदे गटाचा सत्ता समाधाम झाल्यास राष्ट्रवादीतुन शिवसेनेत आलेल्याचा आणि भााजपा विरोधात शिवसेनेतुन लढणायाच्यात नुकसान भाजपाचा होणार यात शंका नाही.
आज तोडफोड गद्दारी बोलणारे करणारे तोंडाला काळे फासणारे बॅनर फाडणारे उदया सत्ताकाळात पुन्हा बंडखोराचे बॅनर लावण्यासाठी जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार अन्यथा सार्वसामान्य जानकाराना प्रत्येक शब्द हदयात कोरून ठेवलेला असतो त्याची चर्चा होईल.
घडलेल्या घडामोडी बंडखोरीपेक्षा सत्तेतुन बाहेर पडण्यासाठी योग्य होती काहीकाळ कमवलेला नाव सुंगीच्या काळात खराब करताना कोणाचा फायदा कोणाचा तोटा त्यापेक्षा कोणासाठी बलीदान हे राजकारण समजणे महत्वाचे वाटते.
No comments