web-ads-yml-728x90

Breaking News

Maharastra Political Crisis : बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी राज्यपाल कोश्यारी मैदानात; पोलीस महासंचालकांना पत्र

 


BYYML NEWSमुंबई

मागील काही दिवसांपासून राज्यात मोठं राजकीय नाट्य सुरु आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी 40 ते 50 आमदारांसह बंड केलं आहे. त्या आमदारांच्या कुटुंबीयांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहलं आहे. त्यामध्ये त्यांनी आमदारांना सुरक्षा देण्याची मागणी केली ( Bhagat Singh Koshyari writes state DGP ) आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आज ( 26 जून ) ते बरे झाले आहेत. त्यानंतर ते राज्यातील राजकीय नाट्यात सक्रिय झाले आहेत. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या पोस्टर फाडले जात आहे. तसेच, काही ठिकाणी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड आणि घराबाहेर निर्दशने करण्यात येत आहेत. त्याच प्रकरणी भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहले आहे. त्यात बंडखोर आमदारांना आणि त्यांच्या कुटुबीयांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

No comments