web-ads-yml-728x90

Breaking News

तहसिलदार विजय तळेकर यांना राज्यपाल यांच्या हस्ते कोविड योध्दा पुरस्कार

 


BY - गौरव शेलार,युवा  महाराष्ट्र  लाइव ठाणे

ग्रामीण भागापासुन शहरीभागात अत्यंत उत्तम प्रशासकीय सेवा करणारे कर्तबगार तहसिलदार विजय तळेकर यांना राज्यपालांच्या हस्ते कोविड योध्दा पुरस्कार देवुन गौरवविण्यात आले आहे.

   कोकण,ठाणे,मुंबई अशी प्रशासकीय सेवा करताना त्यांनी गोरगरीब आदिवासी शेतकरी शालेय विद्यार्थी व्यापारी लोकप्रतिनिधी समाजसेवक यांची प्रशासनाच्या पारदर्शक सेवेचा लाभ देवुन कामे केली.पुरहाणीत त्यांचे नेहमीच कर्तबगार काम असतच असेच काम पनवेल तालुक्यात केल्याने त्यांचा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी कोविड योध्दा असा सन्मान राज्यपालांच्या हस्ते झाल्याने विजय तळेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

   प्रशासकीय अधिकार्याचा कामकाज कसा असाव त्याची जबाबदारी काय? माणूस म्हणुन जगताना येणार्या संकटावर कशी मदत करून जनसामान्याना न्याय देता येईल कुशल प्रशासन कसे असावे  आपल्याकडे आलेल्या माणसाचं काम झालं पाहिजे त्यांची परिस्थितीची जाण ठेवुन पुरहाणी कोरोना अतिवृष्टी वादळ काळात आजपर्यंत तहसिलदार विजय तळेकर यांचे काम उल्लेखनीय आहे त्यांना महाराष्ट्र शासनाने राज्यपालांच्या हस्ते केलेला गौरव भावी पिढीला दिशादायक आहे त्यांच्या कतृत्वाचे कौतुक करून स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेवजी शेलार ,आमदार किसनराव कथोरे विकासमंचचे अध्यक्षा ज्योतीताई शेलार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments