web-ads-yml-728x90

Breaking News

शासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

कोरोना काळातील कोरोना आपत्ती निवारणाच्या उपायोजनासाठी शासकीय निमशासकीय कर्मचारी यांच्या वेतना मधुन एक दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.या शासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची मागणी मुरबाडचे आमदार किसनराव कथोरे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.शासनाने सदर कर्मचारी यांचे वेतन कपात न करता शासनाने उलट त्यांना कोव्हिड योध्दा म्हणून उत्तेजनार्थ वाढीव रक्कम देण्यात यावी अशी मागणी आमदार किसनराव कथोरे यांनी केली आहे.

No comments