web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड मधील खांडपे गावातील प्रकार;25 लाख खर्चुन बांधलेला पुल की मृत्युचा सापळा ?

 BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

तालुक्यातील अस्तित्वात नसलेल्या मजुर कामगार संस्था कडून कोट्यवधी रुपयांची विकासकामे होत असताना खांडपे येथे नुकत्याच बांधण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम हे  अकुशल कामगारांकडून झाल्याने दर्जाहीन पुलाला मोठे भगदाड पडले असुन या खड्ड्यात दररोज अपघातांची मालिका लागली असुन हा पुल की मृत्युचा सापळा हा संतप्त सवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारला जात आहे.

             मजुर कामगार सहकारी संस्था मध्ये समावेश असणारा कामगार हा सक्षम अधिकाऱ्यांनी मजुर म्हणुन दाखला दिला तरच त्याची कुशल किंवा अकुशल मजुर म्हणुन नोंदणी होते. ते मजुर कामगार संस्था स्थापन करु शकतात.त्या मजुर संस्था ना शासकीय विकास कामे करता येतात. तालुक्यात असणाऱ्या मजुर संस्था या केवळ कागदोपत्री असुन एकही मजुर अस्तित्वात नसल्याने त्या मजुरांचे सहायक निबंधक सहकारी संस्था मध्ये कोणत्या ही प्रकारे ओळखपत्र उपलब्ध नसल्यामुळे या संस्थाचे लेखापरीक्षण अहवाल ,कामगारांचा अपघाती विमा तसेच प्रत्येक सभासदाने भरलेली फी अशा विविध प्रकारचा लेखाजोखा हा गुलदस्त्यातच असताना शासनाची कोट्यवधी रुपयांची विकासकामे ही ऑनलाईन पध्दतीने होत असताना या संस्थांना कामे मिळतात कशी. शिवाय ज्या यंत्रणे मार्फत हि कामे होत असतात त्या कामावर असणारे मजुर किंवा हे योग्य की अयोग्य यांची देखभाल करण्याची जबाबदारी त्या त्या यंत्रणेची असताना अस्तित्वात नसलेल्या या मजुर संस्था ना जिल्हा फेडरेशन, नियोजन विभाग, वनविभाग, आदिवासी विकास विभाग.सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद या विभागाकडून कोट्यवधी रुपयांची सर्रासपणे कामे मिळत असल्यामुळे दहा कामापैकी चार पाच कामे करणे व सर्व कामांची बिले काढणे असे प्रकार होत असतात.

           प्रशासनाच्या उदासीनतेमुळे असे प्रकार होत असल्याने खांडपे येथिल नागरिकांचा प्रवास हा धोकादायक बनला आहे.

No comments