web-ads-yml-728x90

Breaking News

कोरोना पडदयाआड भ्रष्टाचाराचा कळस सोयी सुविधा बस्नात 80 लाखाच्या कामाला चुना 1 कोटीचा रिकाम पत्राशेड

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

तुम्ही बोलु नका बाहेर पडू नका काळजी घ्या या सरकारच्या नियंत्रण नियमावलीचा फायदा मुरबाड तालुक्यात ठेकेदार आणि आरोग्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यानी चांगलाच फायदा घेतला आहे.मयताच्या टाळू वरचे लोणीखाण्याचा काम राजकारणी सत्ताधिशानी केला आहे.वैद्यकीय अधिकारी टेंडर क्लार्क खोटी बिले काढणारी सार्वजनिक बांधकाम विभागाची अधिकारी टोळीने मुरबाडमध्ये कोटीची बिले कामे न करता टेंडर न काढता काढली आहेत त्यांना सत्ताधारी विरोधक दोन्ही पक्षाचा पाठबळ मिळत असल्याने गरीबाचे मरण स्वस्थ झाले आहे.मुरबाडमध्ये जुने ट्रामाकेअर सेन्टर आहे त्याचे काम ठेकेदारानी पुर्ण केले नाही त्यावरच सन 2020 सालात कोरोनाचा फायदा घेत कोव्हीड सेन्टर सुरू केले त्यावर कोटी रूपये खर्च केले मात्र येथे रूग्णांना व्हॅन्टीनेटर सुविधा नाहीत स्वतंत्र कोव्हीड सेन्टरची गरज असताना वैद्यकीय अधिकारी मंञ्यानी लोकप्रतिनिधीनी आपल्या ठेकेदार अधिकायाच्या सोयीसाठी कोटी रूपायाचा पञ्याचा शेड उभा करून त्यावर कोटीचा खर्च केला त्याचबरोबर जुन्या पडीक कर्मचारी वसाहत बिल्डींग मथ्ये एकही कर्मचारी राहात नसतात 80 लाखाची दुरूस्ती काम टेंडर मॅनेज करून नुसता चुना लावुन लाखोचा भ्रष्टाचार केला आहे.एकही अधिकारी त्याकडे फिरकून पहात नाही.इस्टीमेन्ट प्रमाणे कोणताही काम केले जात नसुन अधिकारी 10 टक्के रक्कम बिलकाढण्यासाठी घेतात 22 टक्के बिलो कमीदराने काम घेतले असुन 12 टक्के जीएसटी निधी मंजूर करून देणायाला 10 टक्के असे 50 टके रक्कम खर्च झाल्यावर ठेकेदार 50 टक्के रक्कमेत काम करणार आहे काय ? केवळ आपल्या ठेकेदाराना पोसण्यासाठी अधिकारी कामे काढतात टक्खेवारी मिळवतात सरकार भ्रष्टाचाराला अभय देतो मात्र सोयीसुविधा अभावी तडफडुन मृत्यु पावणार्या कोरोना रूग्णांसाठी काहीही करू शकत नाहीत.या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करावी अशी मांगणी राज्य व केंन्द्र सरकारकडे करण्यात आली आहे सरकारने सदर कामाची बिले काढु नयेत अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

No comments