web-ads-yml-728x90

Breaking News

Governor Bhagat Singh Koshyari : मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर


 

BY YML NEWSमुंबई

राज्यात शिंदे- फडणवीस सरकार ( Shinde Fadnavis Govt ) स्थापन होऊन एक महिना होत आला असला, तरी अजून राज्य मंत्रिमंडळाचा ( State Cabinet ) विस्तार झालेला नाही. आता याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) हे सुद्धा दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर असून दिल्लीत ते दाखल झालेले आहेत. यावरून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. राज्यातील नाट्यमय राजकीय सतांतरानंतर शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. परंतु, अनेकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा देऊन सुद्धा या सरकारला महिना होत आला, तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यापूर्वीसुद्धा राज्यात नाट्यमय सत्तांतर झालं, त्यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा हस्तक्षेप फार महत्त्वाचा ठरला होता. त्यावरून सुद्धा विविध चर्चांना उधाण आले होते. आता या सर्व चर्चा पाहता एकंदरीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर असून ते दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे. राज्यपाल हे पूर्णता भारतीय जनता पक्षाचे असून त्या पद्धतीनेच ते निर्णय घेत आहेत, असा आरोप अनेकदा मागील महाविकास आघाडी सरकारने लगावला होता. त्याच पद्धतीने ज्या प्रकारे राज्यात राजकीय घडामोडीनंतर शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. यामध्ये सुद्धा राज्यपालानीं फार मोठ्या प्रमाणामध्ये घाई केल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता मंत्रिमंडळ शपथविधीसाठी शिंदे- फडणवीस सरकारकडून राज्यपालांना पत्र जाणं महत्त्वाचं होते. परंतु, अजूनही राज्यपालांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पत्र गेले नसल्याकारणाने सुद्धा शिंदे- फडणवीस सरकार मध्येच अंतर्गत नाराजी असल्याचा सूर सुद्धा उमटत आहे. अशात आता राज्यपालांच्या दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राजकीय घडामोडींना वेग येतो का ? ते सुद्धा बघणं गरजेचं असणार आहे.

No comments