web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडच्या ट्रॉमा केअर सेंटरला शासनाकडून स्टाफ मंजूर;जखमी रूग्णांना मिळणार तात्काळ उपचार....!

 


BY : गौरव शेलार, YML NEWSमुरबाड,ठाणे

मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटर मध्ये शासनानं 15 जणांचा स्टाफ (Staff) मंजूर केला आहे.त्यामुळे आता है ट्रॉमा केअर सेंटर सुरू होऊन तिथं अपघातग्रस्तांवर उपचार (Treatment) करता येणार आहेत.कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुरबाडमध्ये आतापर्यंत फक्त ग्रामीण रुग्णालय होतं. मात्र या महामार्गावर अपघात, माळशेज घाटात होणारे अपघात पाहता त्यातील जखमींवर उपचार करणं या ग्रामीण रुग्णालयात शक्य होत नव्हतं. त्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आलं होतं. मात्र तिथं पदनिर्मिती झाली नसल्यानं कर्मचाऱ्यांअभावी हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू होऊ शकलं नव्हतं.आता महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 23 जून 2022 रोजी याबाबत शासनादेश काढत या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पदनिर्मिती केली आहे. त्यानुसार या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये 15 कर्मचारी असणार असून त्यात 1 अस्थिव्यंग शल्यचिकित्सक, 2 बधिरीकरण शास्त्रज्ञ, 2 डॉक्टर, 1 परिसेविका, 2 अधिपरिचारिका अशी 8 नियमित पदं असणार आहेत. तर 1 अधिपरिचारिका, 3 कक्षसेवक, 1 वाहनचालक, 2 सफाई कामगार अशी 7 पदं बाह्ययंत्रणेद्वारे म्हणजे कंत्राटी पद्धतीनं भरायची आहेतअहमदनगर राष्ट्रीय मार्गावर सतत मोठी वाहतूक सुरू असते. त्यामुळे या महामार्गावर अपघातांची संख्या देखील मोठी आहे. मात्र घाटासारख्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीचे उपचार मिळणं शक्य होत नसल्यानं अनेक जखमींचा कल्याण उल्हासनगरला पोहोचेपर्यंतच मृत्यू होतो. त्यामुळं या ट्रॉमा केअर सेंटरमुळे भविष्यात अनेक अपघातग्रस्तांचा जीव वाचू शकणार आहे.

No comments

satta king