web-ads-yml-728x90

Breaking News

डहाणूच्या हिट अँड रन केसमध्ये पोलीस अधिकारी सुहास खरमाटे निलंबितBY - युवा महाराष्ट्र लाईव - डहाणु।

 चिंचणी-डहाणू या रस्त्यावर भरधाव वेगाने गाडी चालवत वृद्ध दाम्पत्याच्या गाडीला धडक देत त्यांना गंभीर जखमी करून तसेच रस्त्यावर सोडून देत पळून गेलेले डहाणू चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांना पोलीस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी सेवेतून निलंबित केले आहे.

शनिवारी रात्री सुहास खरमाटे यांनी भरधाव गाडी चालवत चिंचणी बायपास येथे स्कुटीला धडक देऊन वृद्ध दाम्पत्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती.यावेळी या पोलीस अधिकाऱयाने जखमी दाम्पत्याला मदत करण्याऐवजी तिथून पळ काढला होता.

या अपघातात वृद्ध पती-पत्नी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले आहे.गाडी चालविणारे डहाणू चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे हे घटनेनंतर गाडी तशीच सोडून ते फरार झाले आहेत.त्यांच्यावर वाणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments