web-ads-yml-728x90

Breaking News

पर्यावरण रक्षणासाठी निसर्गप्रेमींनी अधिकाधिक योगदान द्यावे : राज्यपाल

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

जलस्त्रोत, नदी, पर्वत व जंगले यांच्याप्रति भारतीय लोकांमध्ये अनादी काळापासून पावित्र्याची व आदराची भावना होती. मात्र पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे ही भावना कमी होऊन पर्यावरणाचे सर्वत्र शोषण होत आहे. काही ठिकाणी जंगल माफियादेखील कार्यरत आहेत. अशा वेळी पर्यावरण वाचविण्यासाठी निसर्गप्रेमी नागरिकांनी अधिकाधिक योगदान देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.वन व पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील 30 व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते आज राजभवन येथे पर्यावरण मित्र सन्मान प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांना वन विभागातील उल्लेखनीय कार्याबद्दल पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन गऊ भारत भारती पुणे येथील कर्नाळा चारिटेबल ट्रस्ट या संस्थांच्या वतीने करण्यात आले होते.

No comments