web-ads-yml-728x90

Breaking News

शेतकर्‍यांच्या भातपिकांचे पंचनामे केव्हा करणार:शेतकरी चिंताग्रस्त

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी

अवेळी पावसाने भातपिके जमिन दोस्त झाली आहेत.शेतकरी हवालदिल झाला असताना राजकारणी लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रशासकीय अधिकारी वेळकाढूपणा करत आहेत त्यांचा मोठा फटका शेतकर्‍याना बसला आहे.ठाणे जिल्हयातील भिवंडी तालुका शहापुर कल्याण मुरबाड आंबरनाथ येथील शेतकयांचे भातपिके पावसात कुजून गेली आहेत.काही भातपिके उगवताच पावसाने जमिन दोस्त झाली आहेत.अशा शेतकर्‍यांच्या शेतीचे कृषी तसेच महसुल विभागाकडुन पंचनामे होऊन शेतकर्‍याना नुकसान भरपार्इ दयावी अशी मागणी कृणबी सेना संपर्क प्रमूख रमेश शेलार (आतकोली, भिवंडी) यांनी केली आहे.

No comments