0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड मध्ये मच्छी मार्केट येथे असणारे श्रीमेडीकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्सने चक्क सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवून शासनाच्या आदेशाला फाटयावर मारले आहे.अत्यावश्यक सुविधा म्हणुन मेडीकलला सहभाग म्हणुन नोंदविला असताना आपल्या मना प्रमाणे चालढकल करून तसेच कोणत्याही डॉक्टराची औषधी चिठ्ठी न पहाता तसेच औषधांची विक्री केली जाते.नोंदनी करणार्‍या कॉम्पुटर मध्ये बोगस डॉक्टरांची नावे पहाणी केल्यास दिसून येतील रोडालगत असणार्‍या मच्छी मार्केट येथील श्रीमेडीकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स यांचे लायसन्स कोणाच्या नावे व कोण चालवतो याची चौकशी तक्रारदारानी शासनाकडे केली आहे.सोशल डिस्टन्सिंग संपुर्ण मुरबाड तालुक्यात पाळला जातो.त्यावर मुरबाड नगरपंचायतीची कमिटी निर्गमित केली असताना श्रीमेडीकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स व ठिकाणी का पाहणीला जात नाही असा सवाल नागरिकांनी केला आहे.

Post a comment

 
Top