web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड शहरात त्या माकडानी काढले लोकांना घराबाहेर


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
लॉकडाउन संचारबंदीने घरात डांबलेल्या लोकांना मुरबाडमध्ये  माकडांनी घराबाहेत काढल्याची घटना घडली आहे.
          लॉकडाऊनमुळे जंगलात वाटेवर उभी असणारी माळशेज घाटातील माकडं मुरबाड शहरात वाहनाच्या टपावर बसून आली.खाणं पिण्याचं साधब नसल्याने माकडांनी शहरात वास्तव्य निर्माण केले आहे.
          माकडांना शहारातील नागरिक खाणंपिणं देतात परंतू माकडांचा उच्चांक एवढा  वाढला की माकडांनी लोकांच्या घरात घुसून मिळेल त्या वस्तुंची तोडफोड करून वस्तु  पळवून नेल्याच्या घटना घडत आहेत.मुरबाड जोगेश्‍वरी,मरीआर्इ मंदीर  जवळ माकडांनी हौदास घातल्याची माहिती वनविभाग यांना दिली मात्र मुरबाड वनाधिकारी यांचा फोन स्विच ऑफ होता.वनाधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष झाले असून लाकडतोडे लाकूड वाहतुकदारांना परवानगी देण्यात रमले आहेत.

No comments