web-ads-yml-750x100

Breaking News

वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर हल्ला तर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आश्वासन

BY - युवा महाराष्ट्र लाइव – बुलडाणा |
बुलडाणा जिल्ह्यात वृत्तसंकलन करण्याकरिता गेलेल्या पत्रकाराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करणार असल्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत
खामगाव येथील अग्रवाल फटाका केंद्र हे अवैध असल्याने तहसीलदार खामगाव यांचे पथक पोलिस कर्मचाऱ्यांसह अग्रवाल फाटा केंद्र सील करण्याची कारवाई करत असताना चे वृत्तसंकलन करण्याकरिता गेलेले पत्रकार शिवाजी भोसले यांना सुनील अग्रवाल , संगीत अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी देत भोसले यांचा मोबाईल फोडण्यात आला,
याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येऊन कारवाई करण्यात यावी यासंदर्भात मराठी पत्रकार संघ व टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन च्या वतीने माननीय जिल्हाधिकारी सुमन चंद्र व जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना निवेदन देण्यात आले तर आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिले आहे.

No comments