0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – कोल्हापूर |
कागवाडमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत कंटेनर घुसून हा अपघात झाला. या अपघातात 3 ठार झाले आहेत. तर 2 जण गंभीर जखमी आहेत. कागवाड अथणी गणेशवाडी ता. शिरोळ दरम्यान कर्नाटक हद्दीत दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत कंटेनर घुसला. घटनेनंतर एकच धावपळ उडाली. या अपघातात कागवाडच्या दोघासह इंगळगाव येथील दोन वर्षांचा मुलगा जागीच चिरडला गेला. तिघांच्या अंगावर, डोक्यावर कंटेनर चाक गेल्याने शरीराचं चेंदामेंदा झाला.

Post a comment

 
Top