0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – बीड |
भाजपची मजबूत टिम आता आपल्या सोबत आहेत. विरोधक आपसात भांडण्यात व्यस्त आहेत. युवक त्यांना सोडून जातोय तर तर जे वृध्द आहेत ते आता हताश झाले आहेत. थकलेले आणि हताश लोकांची महाराष्ट्राला गरजच काय असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
ते परळीत महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते. पुढे बोलताना मोदी म्हणाले, कार्यशक्ती विरुध्द स्वार्थशक्ती अशी महाराष्ट्रात लढत होत आहे. लोक कार्यशक्तीची पुजा करतात आणि स्वार्थाला झिडकारतात. इतक्या दिवस यांनी स्वार्थीपणाचे राजकारण केले आणि आम्ही देशभक्तीचे. भाजपाची स्थापना झाली तेव्हापासून आम्ही 370 कलम हटविण्याच्या विरोधात होतो. आता आम्ही ते कलम हटविले आहे. कलम हटविताना विरोधकांनी स्वार्थीवृत्तीने यालाही विरोध केला. आता त्यांना त्यांची जागा दाखवा. कलम हटविल्यामुळे लोकशाही धोक्यात आली, राष्ट्र सुरक्षेला धोका निर्माण झाला, आता कश्मिर आपल्या हातचा जाईल, असे विरोधक सांगत होते. यातील एकही गोष्ट झाली नाही. त्यामुळे तुम्ही मजबूत आशा भाजपच्या पाठीशी उभे रहा, ते लोक तुमच्या विश्वासाला धोका देत होते. त्या सगळ्यांना धडा शिकवून बीड जिल्ह्यात भाजपला रेकॉर्डब्रेक मतदान करा, असे अवाहनही मोदी यांनी केले. यावेळी व्यासपीठावर परळीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे, माजलगावचे उमेदवाद रमेश आडसकर, गेवराईचे उमेदवार लक्ष्मण पवार, आष्टीचे उमेदवार भीमराव धोंडे, केजच्या उमेदवार नमिता मुंदडा, आणि शिवसेनेचे बीडचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक खा.प्रीतमताई मुंडे यांनी केले.

Post a comment

 
Top