0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – सोलापूर |

सध्या राज्यभरात जोरदार पाऊस बरसत आहे. मात्र काही भागांमध्ये अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही. दरम्यान सोमवारपासून जिल्ह्यात कृत्रिम पावसाच्या शास्त्रीय प्रयोगाला सुरुवात केली जात आहे. होटगी रोडवरील विमानळावरुन पहिले विमान ढगांचा आढावा घेण्यासाठी तर दुसरे ढगांमध्ये कॅल्शियम क्लोराईडची फवारणी करण्यासाठी उड्डाण घेणार आहे. सप्टेंबरअखेर हा प्रयोग सुरू राहणार असल्याचे आयआयटीएमच्या प्रकल्प संचालक तारा प्रभाकरन यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

Post a comment

 
Top