0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – गोंदिया |

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण गंभीर जखमी आहेत. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील डव्वा गावाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे. या ट्रकमध्ये एकूण 14 मजूर कामगार होते.गेले दोन दिवस गोंदियामध्ये पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या कामाला लागला आहे. मजुरांना शेतात लागवडीसाठी घेऊन जात असाताना अचानक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक नाल्यात पडला.ट्रकमध्ये एकूण 14 मजूर होते. या अपघातात एकूण चार जणांना आपले प्राण गमवावे लागले. अपघाता दरम्यान तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर काहीजण गंभीर जखमी झाले होते. यामधील एकाचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला.

Post a comment

 
Top