CNG Rate : देशात सर्वात महाग सीएनजी दर नागपुरात, अचानक झाली मोठी वाढ
BY :- YML NEWS - नागपूर
देशात सर्वात महाग सीएनजी नागपूरात मिळत आहे. नागपुरात आज सीएनजीच्या दरांमध्ये अचानक सहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरात सीएनजीचे दर ११६ रुपये प्रति किलो पर्यत गेले आहेत.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिले जात होते. मात्र, सीएनजीच्या दरातही मोठी वाढ झाल्याने नागपुरातील सीएनजीचे दर महाराष्ट्रातच नाही तर देशात सर्वाधिक ठरले आहेत. त्यातही नागपुरात सीएनजीचे तीन पंप असून सध्या फक्त एकाच पंपावरच सीएनजी उपलब्ध आहे.
No comments