web-ads-yml-728x90

Breaking News

Youth died falling in mine: खदानीत पडून तरुणाचा मृत्यू, मुंबईतील दहिसर भागातील घटना

 


BY YML NEWSमुंबई

दहिसर पू. येथील वैशाली नगरमधील सुहासिनी पावसकर ( Youth died falling in mine in Dahisar ) मार्गावर असलेल्या खदानात दोन तरुण पडले. ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. खदानीत पडलेल्या तरुणांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी फिरत असताना पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे खदान असल्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण खदानीत पडले. त्यानंतर त्यातील एकाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. तरुणाचे नाव शेखर पप्पू विश्वकर्मा (वय १९) असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे. अंधेरी, सांताक्रुज, खारसह 'या' भागांमध्ये मुसळधार पाऊस - मुंबई, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जगमेश्वरी, अंधेरी, खार, सांताक्रुज, विलेपार्ले, दादर, बांद्रामध्ये ( Heavy rains in Borivali Kandivali Malad Goregaon ) मुसळधार पाऊस कोसळला आहे. सर्वत्र पावसाचा जोर वाढत असताना राज्यासाठी ( Heavy rains in some parts of Mumbai ) पुढचे पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. पुढचे पाच महाराष्ट्र, मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मुंबई उपनगर भागात ऑरेंज अलर्ट ( Heavy rains in Jagmeshwari Andheri ) जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांना इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज मराठवाड्यातील काही भागांत 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळ वारा व मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, मराठवाड्यात 6 व 7 जुलै रोजी देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

No comments