web-ads-yml-728x90

Breaking News

Unveiling of Ashoka Pillar: पंतप्रधानांकडून अशोक स्तंभाचे अनावरण; ओवेसींनी केली टीका

 


BY YML NEWSनवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवीन संसद भवनाच्या छतावर राष्ट्रचिन्हाचे अनावरण केले. कांस्य बनवलेल्या या चिन्हाचे वजन 9, 500 किलो आहे आणि त्याची उंची 6.5 मीटर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याला सपोर्ट देण्यासाठी सुमारे 6,500 किलो स्टीलची रचना तयार करण्यात आली आहे. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, प्रल्हाद जोशी आणि खासदार हरिवंश सिंह उपस्थित होते. हैदराबादचे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधानांच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ओवेसी यांनी ट्विट केले की, 'संविधान संसद, सरकार आणि न्यायपालिकेचे अधिकार वेगळे करते. पंतप्रधानांनी, सरकारचे प्रमुख या नात्याने, नवीन संसदेच्या इमारतीवर राष्ट्रीय चिन्हाचे अनावरण करू नये. लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात जे सरकारच्या अधीन नसतात. पंतप्रधानांनी सर्व घटनात्मक नियमांचे उल्लंघन केले आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

No comments