web-ads-yml-728x90

Breaking News

Thane Police : ठाणे पोलिसांची वेबसाईट तपास सायबर सेलकडून एटीएसकडे ?

 


BY : YML NEWS ठाणे

ठाणे पोलीस ( Thane Police ) आयुक्तालयाची ( Thane Police Commissioner ) वेबसाईट 6 तास हॅक केल्याची घटना १४ जून २०२२ रोजी घडली होती. सदर गुन्ह्याचा तपास हा सायबर सेल विभागाद्वारे ( Cyber Cell Department ) करण्यात येत होता. दरम्यान आता हा तपास एटीएसकडे ( ATS ) सोपविण्यात आल्याची पोलीस ( Police ) सूत्रांची माहिती आहे. नुपूर शर्मा यांनी मुस्लिम समुदायाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने भारतात आणि मुस्लिम राष्ट्रात असंतोष पसरला होता. या घटनेनंतर 14 जूनला नुपूर शर्मा हिच्यावर कारवाई होत नसल्याने ठाणे पोलिसांची वेबसाईट ही हॅक करण्यात आली होती. तब्बल 6 तासानंतर हाक केलेली वेबसाईट ही सायबर सेलने रिकव्हर केली होती. हाक केलेल्या वेबसाईट उघडताच हॅकर्सने संदेश दिला होता. या प्रकारानंतर वेबसाईट रिकव्हर करून, पूर्ववत केल्यानंतर अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या हॅकर्सचा शोध सायबर सेल करत असतानाच सदरच्या गुन्ह्याचा तपास एटीएस पथक करणार आहे. प्रकरण एटीएसकडे सोपविण्यात आले आहे. याच्या मागचे कारण समजू शकले नाही.

No comments