web-ads-yml-728x90

Breaking News

Thackeray On Mumbai : माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका, उद्धव ठाकरेंचे नव्या सरकारला आवाहन

 


BY YML NEWSमुंबई

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड करून शिवसेनेचा मोठा गट फोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. भाजपनेते देवेद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी अटकळ बांधली जात असतानाच भाजपने संख्याबळ जास्त असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा मान दिला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, त्याला उद्धव ठाकरे यांनी आज आक्षेप घेतला. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी आज म्हटले. मुंबईवर राग नको - एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होत असल्याचे दिसल्याने अखेर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे शिवसेना भवनात ( Shivsena Bhavn ) आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका, असं आवाहनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी आज विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या सरकारला केलं आहे. नव्या सरकारने सत्तेवर येताच आरेमधून कांजूरमार्गला नेलेले कारशेड पुन्हा आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला हे आवाहन केलं आहे.

No comments