web-ads-yml-728x90

Breaking News

Supreme Court Hearing Shivsena Petition : आमदारांना निलंबित करण्याच्या शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी


 

BY YML NEWSमुंबई

एकनाथ शिंदेंसह ( Chief Minister Eknath Shinde ) 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने आपल्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत केली होती. या याचिकेची सुनावणी तातडीने घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या प्रतोदच्या नियुक्तीला शिवसेनेने आक्षेप घेतला होता. 16 आमदारांच्या निलंबनाच्या ( Rebel MLA ) मागणीवरील निर्णय प्रलंबित असताना ही घोषणा कशी होऊ शकते? असा दावा शिवसेनेच्या याचिकेत करण्यात आला करण्यात आला होता. ही याचिकाही तातडीने सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली नव्हती. 11 जुलैला या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली होती. मात्र, त्यावेळी सर्व याचिकांबाबत वेगळ्या खंडपीठाचा आवश्यकता असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. या याचिकेसह अन्य काही याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. आमदारांचे निलंबन, प्रतोदची नियुक्ती यासह सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणांच्या अन्य काही याचिका दाखल आहेत. शिंदे गटाने सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली होती. यावरही शिवसेनेने आक्षेप घेतला होता व न्यायालयात धाव घेतली होती. त्याशिवाव राज्यपालांनी विश्वासदर्शक चाचणीसाठी विधिमंडळाचे अधिवेशन बोलावले होते. यावर देखील शिवसेनेने आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. न्यायालयात 11 जुलैला या सर्व याचिकांवर सुनावणी झाली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी 20 जुलै ही तारीख दिली होती.

 

No comments