web-ads-yml-728x90

Breaking News

Sonia Gandhi ED inquiry : सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरून संसदेत गदारोळ, कायद्यापुढे सर्व सारखे आहेत की नाही? केंद्रीय मंत्र्याचा सवाल

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आज ईडीसमोर ( Sonia Gandhi ED inquiry ) हजर राहावे लागणार आहे. नॅशनल हेराल्ड संबंधी मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. मात्र, त्यांच्या चौकशी आधीच देशात काँग्रेस पक्षाकडून ईडी ( Uproar in Parliament over Sonia Gandhi ED inquiry ) आणि केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली जात आहे. या विरोधाची ठिणगी संसदेतही पडली आहे. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांमध्ये घोषणाबाजी झाल्याने तेथील कामकाज तहकूब ( Lok Sabha adjourned ) करण्यात आले आहे. लोकसभेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी विरोधकांवर चांगलेच संतापले. कायद्यापुढे सर्वे सारखे आहेत की नाही? काँग्रेस अध्यक्ष काय सुपर ह्यूमन आहेत का? काँग्रेस स्वत: ला कायद्याच्या वरती समजते काय? असा संतप्त सवाल करत जोशी यांनी विरोधकांना धारेवर धरले. सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात देशात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. चौकशीसाठी सोनिया गांधी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. सोनिया गांधी यांची आज ईडी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. त्याच्या निषेधार्थ आणि सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. काँग्रेस मुख्यालय परिसरात ही घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, सोनिया गांधी चौकशीसाठी येणार असल्याने ईडी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काही ठिकाणी बॅरिकेडींगही करण्यात आले आहे.

No comments