web-ads-yml-728x90

Breaking News

Shiv Sena Support Droupadi Murmu : एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूला शिवसेना पाठिंबा देणार - उद्धव ठाकरे

 


BY YML NEWSमुंबई

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असलेल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले ( Shiv Sena Support Droupadi Murmu ) आहे. काल झालेल्या खासदारांच्या बैठकीनंतर आता शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या 18 जुलै रोजी होणार आहे. काल शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्यात कोणीही माझ्यावर दबाव आणला नाही. राष्ट्रपतीपदी कुणाला पाठिंबा द्यायचा हे तुम्ही ठरवा. कुणाला द्यायचा कुणाला नाही हे तुम्ही सांगाल तसं. कारण हा विषय तुमचा आहे. आजही मी भूमिका स्पष्ट करत आहे. मातोश्रीवर गर्दी आहे. इथेही गर्दी आहे. मी पराभूत झालेल्या काही उमेदवारांशी बोललो. जिल्हाप्रमुखांशी चर्चा सुरू आहे. खासदारांशी चर्चा सुरू आहे. शिवसेनेतील आदिवासी समाजात काम करणाऱ्याांनी विनंती केली. एकलव्य संघटनेचे ढवळे त्यांनी मला विनंती केली. निर्मला गावित आणि आमशा पाडवी यांनीही विनंती केली. आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळत आहे. आम्हालाही ओळख मिळेल. त्यांना पाठिंबा दिला तर बरं होईल. त्यांनी प्रेमाचा आग्रह केला. त्यामुळे शिवसेना द्रोपदी मुर्मू यांना आम्ही पाठिंबा जाहीर केला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ( Shiv Sena will support NDA candidate Draupadi Murmu ) जाहीर केले.

 

No comments