web-ads-yml-728x90

Breaking News

Robbery Murbad | मुरबाड पोलिसांच्या ''रिंग राऊंड'' पोलिसिंगला मोठे यश;आरोपीना रंगेहात पकडून ठोकल्या बेडया...!

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

गेल्या 10 महिण्यापासुन मुरबाड पोलिसांनी रात्री दिवसा पोलीस ठाणे हद्दीत रिंग राऊंड पोलिसींग गुन्हे प्रतिपबंधक ग्रस्त सुरू केली आहे.

संपुर्ण महाराष्ट्रात बँक एटीएम फोडुन चोरीचे गुन्हे होत असताना याच रिंग राऊंड दरम्यान मुरबाड पोलिसांच्या सतर्कतेने रिंग राउंड गुन्हे प्रतिबंधक ग्रस्तीमुळे दिनांक 15 जुलै 2022 16 जुलै 2022 च्या रात्री विद्यानगर मुरबाड येथील ॅक्सेस बँक एटीएम फोडुन चोरी करण्यासाठी लोखंडी पार ग्यास कटर इतर साहित्य घेवुन आलेल्या चोरी करत असलेल्या चोरांना ऑन दि स्पॉट छापा टाकून मुरबाड पोलिसांनी एटीएम तोडत असतानाच पकडल्याने मोठा अनर्थ टळला यात बँकेचे लाखो रूपये वाचले असुन मुरबाड पोलिसांच्या हया धाडसी सतर्क पोलिसिंगचे सर्वत्र कौतुक होत आहे.संपुर्ण मुरबाडकर जनतेकडुन समाधान व्यक्त केले जात आहे.सदरची कारवाई वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय निंबाळकर ,पो..शेलारमामा, पो.ना. कैलास पाटील ,पो.शि.चालक भगवान बांगर ,पो..सुरवाडे ,पीसी दिघे ,खंडाळे यांनी केली आहे.गुन्हयाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे ,एपीआय सोनोने ,पीएसआय तळेकर,रामा शिंदे ,अमोल माळी, विजय गांजाळे हया संपुर्ण मुरबाड पोलिसांनी संपुर्ण मुरबाडची नाकाबंदी करून लपून बसलेले तीन आरोपी त्यांची होंडा सिटी कार सह पकडले आहेत.

  मुरबाड शहरातील सर्व बँक, एटीएम ,ज्वेलर्स ,किराणा व्यापारी व्यवहार करणाऱ्यां ना संस्थाना सुरक्षा रक्षक नेमणे बाबत मुरबाड पोलिसांनी वेळोवेळी बैठका घेवुन लेखी कळवले होते त्याकडे मात्र व्यापारी वर्गांनी दुर्लक्ष केले जनतेच्या पैश्याची बँक काळजी घेत नाहीत या बाबत बँक एटीएम सेंटर बाबत जनतेत नाराजीचे सुर उमटत आहे.

 

 

No comments