web-ads-yml-728x90

Breaking News

Nitin Gadkari on Judiciary : निर्णय देणे हा न्यायपालिकेचा अधिकार, त्यात कोणाचा हस्तक्षेप असू नये - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 


BY : YML NEWS नागपूर

नागपूर आता शैक्षणिक हब बनत ( Nagpur is Becoming Educational Hub ) आहे. आता नागपुरात आयआयएम, आयटी, आणि लॉ युनिव्हर्सिटी सुरू ( Maharashtra Law University in Nagpur ) होत आहे. यात मला विश्वास आहे, येत्या काळात जगात कायदे विधिज्ञ क्षेत्रात मोठ्या उच्चस्तरावर नेण्यासाठी आणि गुणवत्ता पूर्ण बनवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांनी बोलून दाखवला. ते नागपुरात महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या वसतिगृह ( Inauguration of Maharashtra National Law University Hostel ) आणि सुविधा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. न्यायपालिकेच्या निर्णयांवर विश्वास ठेवला पाहिजे, आणि त्यात कोणीही हस्तक्षेप करू नये. मात्र, न्याय लवकर मिळाले पाहिजे, हे ही तेवढेच आवश्यक आहे. तसेच, निर्णय देणे हा न्यायपालिकेचा अधिकार त्यात कोणाचा हस्तक्षेप असू नये. मी काही कंपन्या उशिरा न्याय मिळाल्यामुळे बुडताना पाहिल्या आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट ही योग्य वेळेतच मिळाली पाहिजे, असेही केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले आहेत.

No comments