web-ads-yml-728x90

Breaking News

MUMBAI NEWS | मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने ग्रंथपाल संजय वारूळे यांचा सत्कार....!


BY YML NEWSमुंबई

शासकीय सेवेतून निवृत्त होत असलेले ग्रंथपाल संजय वारूळे हे पत्रकारांचे मित्र असून त्यांनी विधिमंडळ पत्रकार कक्षात पत्रकारांची सेवा केली आहे असे प्रतिपादन मंत्रालय मित्र मंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर यांनी मंत्रालयात पत्रकार कक्षात केले.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने संजय वारूळे यांचा सपत्निक सत्कार मंत्रालयात करण्यात आला, त्याप्रसंगी मंदार पारकर बोलत होते.

सेवानिवृत्त संजय वारूळे यांनी निवृत्तीनंतर आपल्या कुटुंबीयांना वेळ द्यावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगीआम्ही जुन्नरकर व आम्ही पश्चिम महाराष्ट्रकर पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांच्या हस्ते संजय वारूळे यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

माझा महाराष्ट्र शासनाने २०११ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव केला. त्यावेळी वारूळे यांनी मदत केली होती असे सांगतानाच वारूळे माझे नातेवाईक तर आहेतच पण त्यांचे आणि माझे नाते रक्तापेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना पत्रकार नासिकेत पानसरे यांनी व्यक्त केली.या प्रसंगी वार्ताहर संघाचे कोषाध्यक्ष प्रवीण राऊत, कार्यकारिणी सदस्य राजू झनके यांची भाषणे झाली

No comments