Mumbai Metro : मुंबई मेट्रोच्या कामासाठी वाहतूक बंद;आरे कॉलनीत वाहतूक कोंडीची शक्यता
BY – YML NEWS – मुंबई
राज्यात सत्तांतरानंतर पुन्हा आरे कार शेड प्रकरणावरून ( The saw car shed case ) राज्य सरकार आणि पर्यावरण प्रेमी यांच्यामध्ये आंदोलन सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने आरे कॉलनीतील कार शेडला स्थगिती दिल्यानंतर नव्याने आलेले शिंदे सरकारने या सर्व स्थगिती उठवल्यानंतर पुन्हा मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. याला पर्यावरण प्रेमींचा विरोध असल्यामुळे कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये याकरिता वाहतूक पोलिसांकडून परिसरात वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुंबई उपनगर वाहतूक पोलीस ( Mumbai Suburban Traffic Police ) उपआयुक्त यांनी परिपत्रकात असे म्हटले आहे की, मुंबईतील गोरेगाव चेक नाका ते मरोळ नाकाला जोडणारा आरे कॉलनीमधला मुख्य मार्ग मुंबई पोलिसांनी पूर्ण बंद केला आहे. आज सकाळपासूनच हा मार्ग वाहतुकीसाठी 24 तासांसाठी बंद ( Road closed to traffic for 24 hours ) असणार आहे. मुंबई महापालिका आणि मुंबई मेट्रोच्या कामासाठी रस्ता बंद करण्यात आल्याचे कारण मुंबई वाहतूक पोलिसांनी दिले आहे. हा मार्ग बंद असल्याने आरे मार्गे पवईला जाणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. त्याच्या परिणामी आता पवईला जाण्यासाठी जेव्हीआरएल मार्गांवरून जावे लागत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरे कॉलनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना आरे कॉलनीतील मार्ग वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.
No comments