Maharashtra Rain Update : राज्यात जोरदार पावसाचा इशारा, आज 'या' ठिकाणी रेड अलर्ट
BY – YML NEWS – मुंबई
राज्यामध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ( Maharashtra Rain Update ) या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली, या ठिकाणी पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता असून, त्यानंतरच्या 3 दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे. तर मुंबई ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतकरी वर्गाला पावसाची प्रतीक्षा लागली आहे. राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचे चित्र आहे. पुढील 2 दिवसामध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तर अनेक ठिकाणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
No comments