web-ads-yml-728x90

Breaking News

Heavy Rain In Kolhapur : मुसळधार पाऊस..! कोल्हापूरसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल, पाणीपातळी इशारा पातळीकडे


 

BY : YML NEWS – कोल्हापूर

कोल्हापूरात पावसाचा ( Heavy Rain In Kolhapur ) जोर वाढतच चालला असून, पंचगंगा नदीच्या ( Panchganga river ) पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे. रात्री उशीरा पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली असून नदीची पाणीपातळी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. जिल्ह्यातील ( district ) जवळपास 25 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ( District Administration ) नदीकाठच्या सर्वच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरफच्या 2 तुकड्या ( NDRF Team ) दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळमधील टाकळीवाडी येथे पोहचली आहे. दुसरीकडे तुकडी कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात ( Collector Office ) दाखल झाली आहे. संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरफच्या 2 तुकड्या दाखल झाल्या. एक तुकडी शिरोळकडे रवाना झाली असून दुसरी तुकडी मंगळवारी रात्री सव्वा 9 च्या दरम्यान कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या तुकडीचे प्रमुख व जवानांची भेट घेऊन बचाव व मदत कार्याच्या अनुषंगाने संवाद साधला. यावेळी निरीक्षक बृजेश कुमार रैकवार, शरद पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

 

No comments