web-ads-yml-728x90

Breaking News

Droupadi Murmu Become President : द्रौपदी मुर्मू विजयी, मोदी-शाह जोडी पुन्हा हीट, एनडीएच्या बाहेरचीही मते मिळाली

 


BY : YML NEWS नवी दिल्ली

राष्ट्रपतीपदाची निवडणूक ( DROUPADI MURMU WINS) एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी जिंकली आहे. या निवडणुकीसाठी एकूण 4754 मते पडली, त्यापैकी द्रौपदी मुर्मू यांना 2824 प्रथम पसंतीची मते मिळाली, तर यशवंत सिन्हा यांना 1,877 मते मिळाली. 53 मते अवैध ठरविण्यात आली. दुसरीकडे, लोकसभा आणि राज्यसभेबद्दल बोलायचे झाल्यास, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना लोकसभा आणि राज्यसभेतून 540 मते मिळाली, तर यशवंत सिन्हा यांना 208 मते मिळाली. अशा स्थितीत द्रौपदी मुर्मूच्या बाजूने किती खासदारांनी क्रॉस व्होट केले याचा अंदाज लावला जाऊ शकतो. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती ( President Droupadi Murmu ) पदाच्या निवडणुकीत प्रचडं बहुमताने विजयी झाल्याने मोदी-शहा यांची देशाच्या राजकारणातील ताकद पुन्हा दिसून आली आहे.

No comments