web-ads-yml-728x90

Breaking News

CM Eknath Shinde Takes Charge : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रालयात पदभार स्वीकारला

 


BY YML NEWSमुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांच्या दालनात पदभार ( CM Eknath Shinde Takes Charge ) स्वीकारला. शिंदे आज पदभार स्वीकारणार असल्याने मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयाची सजावट करण्यात आली आहे. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मंत्रालयात प्रवेश केल्यानंतर प्रथम मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयातील महापुरुषांच्या फोटोला अभिवादन केले. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेतील अनेक बंडखोर आमदार उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री दालनाकडे जात असताना अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. एकनाथ शिंदेंनी पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रालयात अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. पदभार घेतल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

No comments