web-ads-yml-728x90

Breaking News

Cannabis Seized In Solapur : सोलापुरात पन्नास लाखांचा गांजा जप्त; सांगोला पोलिसांची मोठी कारवाई

 


BY : YML NEWS सोलापुर

सोलापुरातील सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी जवळपास 43 लाख 66 हजार रुपयांचा गांजा जप्त ( Cannabis Seized In Solapur ) केला आहे. पेट्रोलिंग करताना पोलिसांनी इनोव्हा कारची तपासणी केली. त्यामध्ये संशयीत आरोपींनी वेगवेगळ्या पोत्यांत गांजा भरून ठेवला होता. सांगोला पोलिसांनी इनोव्हा कार, गांजा, मोबाईल असा एकूण 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी संग्राम मलाप्पा पुजारी ( रा. पुसेगाव भवानी नगर, ता. खटाव जि. सातारा यास अटक केली आहे. यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल ( Filed an offense under NDPS ) केला आहे.याबाबत अधिकृत माहिती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.

No comments