‘इट राईट’ च्या माध्यमातून पोषणवर्धनासाठी फिल्म सिटी येथे अन्न व औषध प्रशासनातर्फे जनजागृती
BY – YML NEWS – मुंबई
फूड सेफ्टी ॲण्ड स्टँडर्स ॲथॉरीटी ऑफ इंडिया (FSSAI), नवी दिल्ली द्वारे नागरिकांचे आरोग्य व पोषणस्तर सुव्यवस्थित राहण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात, त्याचाच एक भाग म्हणून, प्रतिवर्षी संपूर्ण भारतात इट राईट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याच धर्तीवर यावर्षीदेखील महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषधी प्रशासन विभाग (मुंबई विभाग) आणि पाथ (PATH) या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे इट राईट कार्यक्रमाचे आयोजन २२ जुलै रोजी आयोजन दादासाहेब फाळके चित्रपट नगरी (फिल्मसिटी) येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन जाधव होते.यावेळी डॉ.जाधव यांनी मार्गदर्शन करताना इट राईट इंडिया कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. आपल्याला अन्नधान्याची कमतरता राहिली नाही, परंतु बदलत्या राहणीमानामुळे आपल्या आहारामध्ये कॅलरीज जास्त तर सूक्ष्म पोषक द्रव्यांच्या कमतरतेचे प्रमाण वाढले आहे. कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण – ५ (२०१९-२१) मध्ये भारतात तसेच महाराष्ट्रात एनिमिया आणि बालकांमधील वाढत्या कुपोषणाची समस्या अधोरेखित केली गेली. ५ वर्षाखालील दोन तृतीयांश मुलांमध्ये एनिमिया तर 50 टक्क्याहून अधिक महिलांमध्ये एनिमिया चे प्रमाण आढळले आहे. असे डॉ.जाधव यांनी सांगितले.
No comments