web-ads-yml-728x90

Breaking News

गणेशोत्सव जवळ आल्याने मुरबाडमध्ये मूर्तिकारांची लगबग;श्री गणेश कला निकेतन व अनिता आर्टसच्या कार्यशाळेतुन देश विदेशातुन गणेशमूर्तींची मागणी...!

 


BY - गौरव शेलार, YML NEWS - मुरबाड,ठाणे

गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुंदर सुबक देखण्या गणेशमुर्तीसाठी प्रसिध्द असलेल्या मुरबाड मधील श्री गणेश कला निकेतन अनिता आर्टस म्हसा जांबुर्डेमध्ये मूर्ती कार्यशाळांमध्ये सध्या कारागिरांची लगबग सुरू आहे.येथील मुर्तीकार कांताराम भोपी, अशोक भोपी, सचिन भोपी त्यांचे सहकारी कुशल ,अकुशल कारागीर सध्या रात्रंदिवस कामात व्यस्त असल्याचे चित्र मुरबाड-म्हसा जांबुर्डे येथील तसेच सर्वच मूर्ती कार्यशाळांमध्ये पाहावयास मिळत आहे.

   याच मुरबाड तालुक्याच्या म्हसा,जांबुर्डे येथील श्री गणेश कला निकेतन अनिता आर्टसच्या गणेशमूर्ती महाराष्ट्रासह जगभरात प्रसिध्द आहेत.राज्यातील विविध विविध भागांतून तसेच देश विदेशातून येथील गणेशमूर्तींना मोठी मागणी असून दरवर्षी त्यात सातत्याने वाढ होत आहे.मूर्तीकलेचा परंपरागत वारसा लाभलेले मुरबाड म्हसा जांबुर्डेचे श्री गणेश कला निकेतन अनिता आर्टस मूर्तिकार अनेक समस्या अडचणींवर मात करून दरवर्षी लाखो गणेशमूर्ती तयार करून ही वाढती मागणी पुर्ण करण्यात यशस्वी ठरत आहेत.

सुंदर सुबक देखणी मूर्ती उत्कृष्ट रंगसंगती प्रसन्न भावमुद्रा आणि जिवंतपणा दर्शविणारी डोळयातील सजीव प्रसन्न आखणी हे श्री गणेश कला निकेतन अनिता आर्टसच्या गणेशमुर्तींचे वैशिष्ट असून येथील दगडूशेठ हलवाई, टिटवाळा महागणपती ,लालबागचा राजा ,बाल गणेश, फेटेवाला अशा एक ना अनेक गणेशमूर्तींना सर्वाधिक पसंती लाभली आहे.


No comments