मुरबाड पोलिसांनी निजामपुरा पोलीस ठाणे हद्दीतून ५ लाखाचा मुद्देमाल व १० लाख किमतीचा आयशर टेम्पो चोरून घेवून जाणारा आरोपी मुद्देमाला सह पकडला
BY : YML NEWS – मुरबाड,ठाणे
दोन दिवसा पूर्वी मुरबाड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असताना दि १९/७ ते २०/७ चे रात्री मुरबाड पोलिसांच्या !! रिंग राउंड!! गुन्हे प्रतिबंधक गस्तीस पुन्हा मिळाले मोठे यश ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील निजामपुरा पोलीस ठाणे हद्दीतून ५५२०००/ रुपये किमतीचे पॉलिस्टर धाग्याचे रिम रोल व १०,०००००/ रुपये किमतीचा आयशर टेम्पो सह चोरी करून घेवून गेले होते तो टेम्पो व चोरीस गेलेल्या मालासह midc मुरबाड रोडवर मुरबाड पोलिसांच्या रात्र !!रिंग राउंड!! पोलिसांना आढळल्याने संवशय आल्याने हटकले असता चालक भांबाऊंन गेला तिथे उपस्थित राहण्याचे करण, टेम्पो व टेम्पोतील मालाच्या मालकीचा पुरावा सांगू शकला नाही त्यामुळे हा चोरीचा माल असल्याचा संवशय बळावल्याने चालकासह टेम्पो व आतील माल पंचनामा करून ताब्यात घेतला व त्यांच्या वर crpc कलम ४१( ड) अन्वये कारवाई केली व एकूण १५ लाख ५२ हजार रूपये किंमतिचा मुद्देमाल जप्त केला चौकशीत उघडकीस आले कि नमूद चोरट्याने सदर टेम्पो व आतील साहित्य निजामपुरा पोलीस ठाणे हद्दीतून चोरून घेवून जात होता त्या बाबत निजामपुरा पोलीसांना माहिती देवून सर्व कागदो पत्री कायदेशीर पूर्तता करून आरोपी व जप्त टेम्पो व मुद्देमाल असा १५ लाख ५२ हजार रुपये किमतीचा ऐवज निजामपुरा पोलिसांच्या हवाली केला आहे मुरबाड पोलिसांच्या ह्या कारवाई मुळे चोरांचे धाबे दणाणले आहेत व मुरबाड हद्दीत चोऱ्या करण्याचे धाडस करण्यास ते धजावत नाहीत! सदरची कारवाई api.सोनोने,psi तळेकर Hc.चमन शेख, डोईफ़ोडे, pn. कैलास पाटील, जीवन पाटील, सचिन उदमले,चालक भगवान बांगर ह्या कारवाई मुळे मुरबाड पोलिसांची जनमानसातील विश्वासहर्यता आणखीन वाढली आहे हे मात्र नक्की!
No comments