web-ads-yml-728x90

Breaking News

Kalyan-Murbad Road | कल्याण-मुरबाड रस्ता गेला वाहुन;ठाणे जिल्हयातील यंत्रणा कोमात मुख्यमंत्री साहेब जोमात?...!

 


BY : गौरव शेलार, YML NEWSठाणे

कल्याण तालुक्यात गेल्या चार पाच दिवसापासून पडणा-या मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला असून राया ओझर्ली व पोई येथील घरांची पडझड झाली असून कल्याण मुरबाड महामार्गावरील म्हारळपाडा, वरप कांबा येथील रस्ता वाहून गेला की काय अशी दयनीय अवस्था निर्माण झाली आहे, परंतु महसूल विभागाने अद्यापही या नुकसानीचा पंचनामा केला नाही. अशी माहिती मिळत आहे. शिंदे फडणवीस सरकाच्या कोलांट उड्या अजून पुर्ण झाल्या नाहीत, अद्यापही मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे दिल्ली दौरे सुरू झाले असताना इकडे राज्यात पावसाने कोकणासह मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली, भिवंडी आदी भागाला झोडपून काढले आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. भिवंडी कल्याण मध्ये सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे नुकसान होत आहे. या पावसामुळे कल्याण मुरबाड महामार्गावरील वरप बंजरगहार्डवेअर, सिक्रेट हार्ट स्कूल, टाटा पाँवर हाऊस येथील रस्ता वाहून गेला की काय?अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाजंरापोळ रायते येथील सिंमेट क्राँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या बाजूला जमीन खचली आहे. येथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील अनेक नद्या, बंधारे दुथडी भरून वाहत असून अनेकांची पडझड झाली आहे मागील काही वर्षांचा पुराचा भयानक व भयावह अनुभव पाहता यावेळी तरी शासनाने वेळेवर पुरग्रस्तांकडे/ नुकसान ग्रस्ताकडे लक्ष द्यायला हवे.त्यामुळे शासनाने दौरे, सभा,मेळावे याकडे थोडे दुर्लक्ष करून प्राधान्याने लोकांच्या हिताकडे लक्ष द्यावे असे नागरीकांचे म्हणनं आहे.

No comments