web-ads-yml-728x90

Breaking News

भिवंडी लोकसभा मतदार संघात पुरपरिस्थिती नागरिकांचे हाल;मंत्री टिव्हीवर

 

BY - नामदेव शेलार,YML NEWS - मुरबाड,ठाणे

गेले चार पाच दिवस मुसळधार पावसाने ठाणे जिल्हयात हजेरी लावली आहे.भिवंडी लोकसभा मतदार संघातील भिवंडी कल्याण, आंबरनाथ, शहापुर, मुरबाड, उल्हासनगर या तालुक्यात मोठया प्रमाणात शेतकर्यांचे शेती भाजीपाल घरातील दुकानामधील वस्तुची नासधुस होऊन नुकसान झाले आहे त्याची प्रत्यक्ष पहाणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी मंत्री अद्याप आलेले नाहीत

    दरवर्षी पाऊस पडतोच पुरहाणी होतेच परंन्तु त्यावर आजपर्यंत तोडगा काढण्यास येथील कोणत्याही खासदाराला यश आले नाही मात्र यावेळी केंन्द्रात मंत्री असलेल्या कपील पाटील यांच्या कडुन खुप अपेक्षा होत्या काही काळाच्या मांगण्या होत्या त्याना पुर्ण विराम मिळेल असे वाटले होते परंन्तु जनमाणसाची अपेक्षा भंग झाली आहे.

   भिवंडी लोकसभा मतदार संघातील भिवंडी तालुक्यातील कुरूंद, पडघा ,दळेपाडा ,वाफाळे, डोहळे ,भोकरी, कळंबोली ,भादाणे ,आतकोली ,जुपाडा येथे दरवर्षी पुल साकव गावे पाण्याखाली जातात रस्ते बंद होतात आरोग्याच्या सोयी बिकट बनतात यंदाही असाच प्रसंग येथील गांवकर्यावर आले असुन पडघा भिवंडी शहराचा संपर्क तुटला आहे.

कल्याण तालुक्यातील खडवली ,राया ,बापगांव ,बेहेरे ,आणे, रायतापुल, टिटवाळा, रूंन्दे ,नदगांव, आपटी येथील रस्ते बंद झाले उल्हासनगर मधील वरप ,म्हारळ ,कांबा हा प्रमुख रस्ता जिव घेणा बनला आहे प्रचंड प्रमाणात पाणी रस्त्यावर साचले अंबरनाथ मधील बदलापुर उल्हासनदीलगतच्या रस्त्यावर पाणी आले मुरबाडच्या किशोर, धानिवली ,मुरबाड, शिवळे ,आंबेळा ,शिरोशी, संगम, खानिवरे, म्हसा ,बोरिवली अशा अनेक रस्ते बंद होते तसेच शहापुर तालुक्यातील वासिंद रेल्वे पुलाखालचा रस्ता सापगांव किन्हवली डोळखांव टाकीपठार परिसरात रस्ते बंद होते येथील हजारो शेतकरी नागरिकांचा मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन आरोग्याच्या समस्या गंभीर बनल्या आहेत.बारवी  धरणाखालील गांवे वाडयापाडयाची समस्या आजही जशीच्या तशीच आहे यावर वर्षानुवर्षे तोडगा निघत नाही खासदार असो किंवा आताचे केंन्द्रीयमंत्री प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रशासनाला आदेश देतात परंन्तु उन्हाळयात त्यावर काय तोडगा काढण्यात येईल याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होतय.गेले ते दिवस राहिल्या त्या आजही ताज्या आठवणी म्हणुन लोकप्रतिनिधीना अपयश आले आहे.ठाणे जिल्हयातील प्रमुख भिवंडी लोकसभा मतदार संघातील गुरवली रेल्वे फाटक वासिंद रेल्वे उडाणपुल खडवली रेल्वे फाटक वेहळोली रेल्वे फाटक याकडे दुर्लक्ष झाले आहे.रायता पांजरपोळ पुल ब्रिटीश कालावधीतील त्याकडे दुर्लक्ष झालंय 35 सेक्शन  वनकायदा याकडे दुर्लक्ष करून नुसत्या मुरबाड रेल्वेची स्टेशने बदलण्यात मंञ्याचा वेळ वाया जात आहे.

   राजरकारणाचा स्टंट बंड बाजी असो किंवा बारवीधरण ग्रस्तांना हाताशी धरून भाजपाच्याच आमदाराला आव्हान देणारी संगटन असो त्याच्याशी लोकाना  घेणंदेणं नाही सत्यशोधक निर्भिड पत्रकार तुमच्या व्हीडीओ गप्पा एैकत नाहीत एक मात्र खरं तुमच्या चांगल्या कामाची स्तुती केल्या शिवाय राहणार नाहीत.

  बारवी धरणाची उंची वाढवताना ज्या बनावट घराचे मुल्याकंन केले त्याची चौकशी कारवाई गुलदस्त्यात आहे त्यांच्या भ्रष्टाचारी अधिकार्यावर मंञ्यानी कारवाई करायाला हवी एक रूपायात दवाखाण्यात उपौचार असे  दवाखाने केन्द्रीय मंत्री कपील पाटील यांचे बंद पडले आहेत त्याचा फायदा आजच्या पुरहाणी आरोग्य स्थितीत जनतेला झाला असता मात्र त्यांच्या दवाखाण्याना कुलुप लावलेत त्याकडे पहाणे गरजेचे आहे. 

सध्या मुरबाड रेल्वे सैरवैर धावते कधी आंबिवली निंबवलीवरून कधी अंबरनाथ उल्हासनगर वरून कधी बदलापुर शहाड वरून गेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुरबाडला जाहिर सभेत 50 टक्के निधी जाहिर केलेल्याची घोषणा आता केंन्द्रीय मंत्री कपील पाटील करतात कशासाठी राजकारणाची गाजर रेल्वे एकदा केंन्द्रीय बजेटमध्ये घेवुन कामाला  सुरूवात  करून पुढच्या निवडणुकीची  तयारी करा असे जनमाणसाची अपेक्षा आहे.

  सध्या भिवंडी लोकसभेत भाजपाचे खासदार तथा मंत्री कपील पाटील यांनीच भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्यात गटबाजी आव्हान दिले जाते मात्र काल किसन कथोरे यांच्या सोबत असलेले आज कपील पाटील यांच्या सोबत आहेत नविन चळवळीचा कार्यकर्ता जोडला जात नाही त्यामुळे समस्या जुन्याच घेवुन आजही जुनेच कार्यकर्ते काम पहात असल्याने नविन प्रकल्प मार्गी लागत नाहीत पुराच्या पाण्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे प्रत्यक्षात पहाणी केली पाहिजे नुसते राजकारण जनमाणसाना नको आहे दोन गट असु दया त्यातुन जनतेची कामे होतात मात्र जनतेची दिशाभुल  नको.

No comments