मुरबाड नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांचे पुरहाणी रोखण्याचे प्रयत्न
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे
मुरबाड नगरपंचायत मधील एमटी स्टॅन्ड म्हसारोड चौक मातानगर पेट्रोलपंप रोड एमएसईबी ऑफीस एमआयडीसी रस्ता विद्यानगर तसेच मुख्यबाजारपेठ रोठे आळी नागाचाखडक गणेशनगर या ठिकाणी दरवर्षी पावसाचे पाणी साचून दुकाने घरे यांचा नुकसान होऊन रस्ते बंद पडत होते त्यावर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांनी लक्ष वेधुन पुरहाणीचा सामना केला आहे.
म्हसा रोडवरील तसेच इतर ठिकाणाच्या जुन्या 10 फुट असणार्या गटारी 20 फुट करून साचणारे पाणी जेसीबीच्या यंत्रणेने बाहेर काढण्याचा काम केलं आहे.बाजारपेठेतील गटारी मोकळया केल्याने रस्त्यावर दरवर्षी येणारे पाणी नाल्यातुन नदीला मिळाले आहे.तरीही काहीशा प्रमाणात विद्यानगर मध्ये पाणी साचल्याने त्यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
मुरबाड नगरपंचायतीच्या अध्यक्ष कार्यकाळात रामभाऊ दुधाळे यांनी स्वच्छता रस्ते गटारी पाणी विद्युत दिवे याकडे विशेष लक्ष दिल्याने मुरबाडकरांना समाधान होत आहे.मुरबाड शहरातील नागरिकांना घरबांधणी साठी विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.रामभाऊ दुधाळे यांच्या सामाजिक विकासकामाचा नावलौकिक गेल्या 20 वर्षापासुन असल्याने त्यांच्यात सर्वस्तरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते निपक्षेतेने मैत्रीतुन सर्वाना बरोबर घेवुन मुरबाड शहराच्या विकासासाठी पडलेले पाऊल आहे.
सत्ता येते सत्ता जाते परंन्तु राजकारणापलीकडे काम केल्यास सत्तेतुन पायउतार झाल्यावर व्यक्तीगत संबध जशाचतसे राहतात हा त्यांचा मनोदय भविष्याचा वेध सांगुन जातो.प्रचंड पाऊस पडला सर्वत्र पुरहाणी परिस्थिती झाली असताना यावर्षी मुरबाड शहरात तसेच प्रमूख रस्त्यावर पुरहाणीची स्थिती आढळली नाही रस्ते बंद झाले नाहीत साथीच्या रोगाचा प्रभाव कमी दिसुन आला एमआयडीसीमध्ये वाहाते नाले सुरळित करून बाजारपेठेत पार्किंग झोन उभे केले आहेत अनेक विकास कामे हाती घेवुन त्याचे कार्य सुरू आहे.
No comments