web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड तालुक्याची आपत्कालीन यंत्रणा गायब;जनतेच्या रक्षणा पुराच्या पाण्यात उभे आहेत प्रसाद पांढरे साहेब


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

गुरूपौर्णिमेला पावसानी खरं दर्शन घडवले सर्वत्र पुरहाणी परिस्थिती त्यातुन कल्याण मुरबाड माळशेजघाट रस्त्यावरील छोटया मोरव्या पुलाबरोबर रायता नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने काही तास रस्त्यावर शुकशुकाट दिसत होते.

   मुरबाड धानिवली नदीच्या पात्राबाहेर पाणी पुल बंद किशोर रूग्णालयाजवळ प्रमुख रस्ता पाण्याखाली घोरले पुल पाण्याखाली रायता पुल पाण्याखाली रूंन्दे पुल पाण्याखाली कल्याण म्हारळ कांबा वरप रस्ता पाण्याखाली अशा आवस्थेत मुरबाड कल्याण करांचं हाल झाले.

  मुरबाड कल्याणची आपत्कालीन यंत्रणा काय आहे चार अधिकारी हात हालवत आले म्हणजे आपत्कालीन यंत्रणा काय नुसते आपत येतात यंत्रणा गायब असते यंत्रणा म्हणजे क्रेन जेसीबी डंप्पर अग्निशमकदल बचाव पथक येथे मात्र मुरबाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे आणि त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी महिला पोलिस स्थानिक नागरिक वाहनचालक नागरिकाना कंबरभर पाण्यातुन बाहेर काढत होते वाहानाना रस्ता मोकळा करून देत होते.

   तालुक्याची आपत्कालीन यंत्रणा नुसती नामधारी आहे किशोरचा रूग्णालय पाण्याखाली गेले त्यामध्ये किती औषधे खराब झाली वाहुन गेली कोरोनाचे डोस इंजेक्शन येथेच मोठया प्रमाणात मिळत होते त्याची चौकशी होईल का?

 तहसिलदार कार्यालय नॅशनल हायवे यांच्या आपत्कालीन यंत्रणेवर खर्च किती आणि कुठे होतो त्याची चौकशी होऊन यंत्रणा हवी

  मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांनी रात्रंदिवस मुरबाड शहरालगतच्या रस्ते मोरव्या खुल्या केल्या स्वता जेसीबी क्रेन पथकासह सर्वांसोबत काम करत होते.तरीही विद्यानगर मध्ये पाणी साचल्याने मुरबाड नगरपंचायतीला तारेवरची कसरत करावी लागली त्याच प्रमाणे तालुक्याची आपत्कालीन यंत्रणा तहसिलदार नॅशनल हायवे यांनी राबवायाला हवी मात्र मुरबाड पोलिसांची रात्रंदिवस पेट्रोलिंग करून पुराच्या पाण्यातुन माणसं तसेच वाहानाना सुखरूप काढले त्यांचा सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments