web-ads-yml-728x90

Breaking News

डांस फवारणी आरोग्य तपासणी करावी - नामदेव शेलार

 


BY : गौरव शेलार, YML NEWSठाणे

महाराष्ट्रात पावसाळयात मोठया प्रमाणात गॅष्ट्रो मलेरिया डेंग्यू सर्दी ताप थंडी अन्य साथीच्या आजाराच्या फैलाव होतो जुन महिण्याच्या पहिल्या पावसापासून गौरी गणपती सणापर्यंत हे आजार ग्रामीण शहरी भागात जास्त आढळतात त्यावर मात करण्यासाठी मुरबाड नगरपंचायतीने तसेच पंचायत समिती मुरबाड यांनी प्रत्येक प्रभागात गांवात डांस फवारणी करावी डॉक्टराच्या आरोग्य पथकामार्फत घराघरात तपासणी करावी अशी मांगणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केली आहे. पावसाळयातील धरणे बंधारे तलाव विहीरी मध्ये भरलेले दुषित पाणी गटारी तसेच परिसरात पसरलेले घाणीचे साम्राज्य मध्येच फुटलेल्या पाईपलाईनी यातुन आरोग्याच्या साथी निर्माण होतात त्याकडे स्थानिक प्रशासन आणि सत्ताधारी दुर्लक्ष करतात मात्र साथीचे संकट कोसळल्यावर पथके उपौचार धावण्याच्या प्रयत्न करतात हे दुदैवी आहे.मुरबाडच्या शासकीय आरोग्य सेवा ग्रामीण भागात कुचकामी आहेत ग्रामीण रूग्णालयात मुरबाड एकमेव ठिकाण उपौचाराचे केंन्द्र असल्याने खाजगी रूग्णालयात रूग्णाची मोठया प्रमाणात रेलचेल असते 200च्यावर महसुली गांवात टोकावडा, धसई,म्हसा, सरळगांव, शिवळे हे प्रमूख प्राथमिक आरोग्य केंन्द्र मानली जातात परंन्तु प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंन्द्रात चोविस तास उपौचार सेवा मिळत नाही कर्मचारी डॉक्टराचा अभाव आहे याकडे सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी प्रशासनाने लक्ष घालावे अशी मांगणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी मुख्यमंञ्याकडे केली आहे.डांस फवारणी प्रत्येक प्रभागात गांवात वाडयापाडयात तात्काळ करण्यात यांवी पाणी शुध्दीकरणावर भर दयावा प्राथमिक उपौचाराच्या डॉक्टरांचे पथकामार्फत डेंग्यू ,मलेरिया ,टायफाईड, गॅष्ट्रो अन्य साथीच्या रूग्णाची तपासणी करून त्यांच्यावर तात्काळ उपौचार करावे जेनेकरून गोरगरीबाना आपला जिव गमवावा लागणार नाही याकडे लक्ष वेधावे.

No comments