मध्यावधी निवडणुका, शिवसेनेतील बंड, राज्यपालांची तत्परता ते नामांतर, शरद पवारांची टोलेबाजी
BY : YML NEWS – औरंगाबाद
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सत्तांतर, महाविकास आघाडी सरकारची कामगिरी, नामांतर, शिवसेनेतील बंड यासंदर्भात भाष्य केलं. निवडणुकीसाठी दोन अडीच वर्ष राहिली आहेत, आपण तयारीत राहिलं पाहिजे, याचा अर्थ मध्यावधी निवडणुका होत नाही. निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी वेगळं वातावरण असतं. आता दोन अडीच वर्ष झाली आहेत, आता दोन अडीच वर्ष राहिली आहेत, त्यामुळं तयारी लागा, असे आदेश दिल्याचं शरद पवार यांनी सांगितंल. बंड करणाऱ्यांना सांगायला निश्चित कारण आहे, अशी स्थिती नव्हती. काही जण हिंदुत्व, काही जण राष्ट्रवादीचं कारण सांगत, काही जण निधीचं कारण सांगतात. सूरतला गेल्यावर याबाबत चर्चा सुरु झाल्या. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर या मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे मंत्री अधिक काम करतात, प्रश्न सोडवतात, हे मी आघाडीच्या आमदारांकडून ऐकलं आहे, असं शरद पवार म्हणाले.
No comments