web-ads-yml-728x90

Breaking News

वसई दरड दुर्घटना: मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 6 लाखाची मदत

 


BY YML NEWSमुंबई

वसईच्या राजवली वाघरळश पाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde help ) यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि मनपा निधीतून हा निधी देण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडील नैसर्गिक आपत्तीविषयक निधीतून आणि प्रत्येकी 2 लाख रुपये महानगरपालिकेकडील निधीतून अशी 6 लाख मदत करण्याचे आदेश दिले आहेत. तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पालघर जिल्हाधिकारी तसेच वसई विरार महानगरपालिकेने हा खर्च करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

No comments